Monday, 12 June 2017

अनिल माधव दवे - एक अद्‌भुत व्यक्तिमत्व

अनिल माधव दवे - एक अद्‌भुत व्यक्तिमत्व

ई.स. 1990च्या गुरुपौणिर्ंमा उत्सवात आमच्या कॉलोनीत (रविशंकर शुक्ल नगर- आर.एस.एस. नगर, इंदुर) श्रीअनिल माधव दवे यांचे बौद्धिक झाले होते. त्या नंतर माझी त्यांच्याशी चर्चा ही झाली होती. त्यांचे ते बौद्धिक बहुतच प्रभावी होते आणि नंतर ते त्यांच्या याच कले करिता चांगलेच ओळखले ही जाऊ लागले. पुढ़े जाऊन त्यांच्या भाषणांमध्यें अंतर इतकेच पडले की ज्यावेळेस ते तरुण होते  त्यावेळेस त्यांचे बौद्धिक किंवा भाषण अत्यंत उल्हास आणि जोमाचे असे पण वयोमाना प्रमाणे तितकेच गंभीर होत चालले गेले. त्या नंतर त्यांचे आणि माझे संबंध अधिकच प्रगाढ़ होत चालले गेले. या मागे दोन प्रमुख कारणे होती - पहिल, ते शाळा-कॉलेजात माझे सीनीयर होते आणि त्यांचे या प्रकारे आमच्याच भागात, नगरातच (संघाच्या दृष्टिने आंबेडकर नगर) संघाच्या प्रचारकाच्या रुपात येणे बघून मी अभिभूतच होऊन गेलो होतो. दूसरे कारण झाले स्व. बाबासाहेब नातू जे आमच्या घरी 1956 पासून संघ प्रचारकाच्या रुपात येऊन राहिले होते. ते अनिलजींना आमच्या येथे घेऊन आले व त्यांना म्हणाले होते हे माझे घर आहे येथे कसला ही संकोच करु नकोस व त्या नंतर या कारणामुळेच आमचे संबंध अधिकच वाढ़त गेले. काही वर्षे इंदुर मध्यें कार्य केल्या नंतर ते संघकार्याकरिता भोपाळला चालले गेले व तेथे विभाग प्रचारकाच्या रुपात कार्य करु लागले. त्यामुळे त्यांचे आणि माझे संबंध काही अंशी संपुष्टात आले. पण माझे त्याच्या कुंटुंबात येणे-जाणे मात्र चालत राहिले. 

ज्या वेळेस ते इंदुर मध्यें प्रचारक म्हणून कार्य करित होते त्या वेळेस देखील ते अत्यंत जिज्ञासू व अभ्यासू प्रवृत्तीचे होते. पुढ़े जाऊन त्यांनी कित्येक पुस्तके व लेख लिहिले. 'चरैवेती"चे भोपाळ मध्यें संपादक म्हणून देखील कार्य केल. त्यांच्या 'शिवाजी और सुराज" या पुस्तकाचे विमोचन सरसंघचालक 'श्री मोहनरावजी भागवत" व तात्कालिक शिवसैनिक, भू. पू. केंद्रिय मंत्री 'श्री सुरेश प्रभु" यांनी केले होते. आमुख विश्वातील सगळ्यात मोठे स्वयंसेवी संगठनाचे प्रमुख 'श्री मोहनरावजी भागवत" तर प्राक्कथन 'बाबासाहेब पुरंदरेजी" आणि प्रास्ताविक मोदीजी यांनी (गुजराथचे तात्कालिक मुख्यमंत्री) लिहिल्या होत्या. त्यांच्या जीवना व कार्यशैलीवर 'छत्रपती शिवाजींचा" बहुत मोठा प्रभाव होता. ई. स. 2003 मध्यें दिग्विजयसिंहच्या सरकारच्या पराभवा करिता आणि भाजपच सरकार प्रस्थापित करण्याकरिता त्यांनी जे चुनावी कार्यालय स्थापित केले होते त्याचे नाव 'जावली"च ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या 'शिवाजी और सुराज" या पुस्तकाचा हा काही भाग जो आज देखील प्रासंगिक आहे व ते ज्या 'वन व पर्यावरण विभागाचे" केंद्रिय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होतेशी संबंधित आहे तो या प्रमाणे आहे - 

''स्वराज के जंगलों में आम व कटहल के पेड हैं, जो जलपोत निर्माण में काम आ सकते हैं, परंतु उन्हें हाथ न लगाया जाए, क्योंकि ये पेड ऐसे नहीं हैं जो साल-दो साल में बडे हो जाएं। जनता ने उन पेडों को लगाकर अपने बच्चों की तरह पाल-पोसकर बडा किया है।""

विविध विषयांबद्दलचे ज्ञान, माहित्यां, सूचना समजावून घेण्याची उत्सुकता, रस घेण्याची प्रवृत्ती त्यांच्या मध्यें सुरुवाती पासूनच होती जी शेवट पर्यंत राहिली. जेव्हां ते इंदुर मध्यें प्रचारक होते तेव्हां 'पत्रकार, पत्रकारिता आणि त्यांचा पेशा" जाणून, समझावून घेण्याकरिता या व्यवसायाशी संबंधित काही लोकांशी त्यांची भेटण्याची इच्छा होती. त्यांनी जेव्हां ती इच्छा माझ्या समोर प्रकट केली तेव्हां मी त्यांची गाठभेट इंदुर-लखनऊहून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक वृतपत्राचे मालक श्री श्याम अवस्थीं बरोबर माझ्या निवासस्थानावर घडवून आणली. त्यांची ही वार्ता चांगली दोन-तीन तास चालली. या प्रकारेच दैनिक भास्कर इंदुरचे तत्कालीन संपादक विनोद मिश्र (त्यांच्या नावाचे मला थोडेसे विस्मरण होत आहे) जे अलाहबादाचे राहणारे होते व दैनिक स्वदेशच्या इंदुर संस्करणाच्या आरंभिक दिवसांमध्यें त्यांनी कांही दिवस येथे देखील कार्य केले होते यांच्या बरोबर भेट घडवून आणली होती. त्यांचा फ्लैट माझ्या शापिंग कॉम्पेक्स ए. बी. रोड इंदुरवरील कार्यालयाच्या वरच होता. त्यांच्या बरोबर पण त्यांची दीर्घ चर्चा झाली होती.

जेव्हां ते इंदुर मध्यें नगर प्रचारक होते तेव्हां देखील त्यांची प्रकृती थोडीशी नाजुकच राहत असे. त्यावेळेस अत्यंत विपरीत परिस्थितीं मध्यें कार्य केल्यामुळे व जेवणाची अनियमितता त्यांच्या तब्येतीस हानि पोहोचवित होती. अशातच त्यांच एक ऑपरेशन इंदुरच्या भंडारी हॉस्पिटल मध्यें झाले होते. या मुळे त्यांच्या पथ्यवाल्या भोजनाची व्यवस्था व देखरेख मी आणि माझे कुटुंब पाहत असे. या मुळे देखील त्यांच्या माझ्या संबंधांचे घानिष्ठ्य वाढ़ीस लागले आणि हे शेवटपर्यंत राहिले. त्यांच्या भोपाळला जाण्या नंतर व आणखीनही कांही कारणांमुळे त्यांच्याशी माझा संपर्क जवळपास तुटल्या सारखाच झाला. तो पुन्हा 2006 मध्यें पुनरुज्जीवित झाला जेव्हां ते मला स्वामी ऐश्वर्यानंदजी सरस्वती यांच्या येथे भेटले. जे दक्षिण भारताचे पू. स्वामी दयानंदजी सरस्वती यांचे शिष्य आहेत व अनिलजी पण त्यांच्या वर श्रद्धा ठेवित असत.

ते अत्यंत धार्मिक आणि अध्यात्मिक प्रवृत्तीचे होते व त्यांना साधु-संतांचे सान्निध्य आवडत असे. त्यांनी नर्मदा परिक्रमा जमीन, पाणी व वायु या तीन्हीं माध्यमांनी केली होती. या दरम्यान ते साधु-संतांच्या आश्रमांमधून जात व त्यांच्याशी चर्चा करित असत. त्यांच्यात हे संस्कार त्यांच्या आई-वडिलां मुळे आले होते व त्यांची त्यांच्यावर अगाध श्रद्धा होती. त्यांच्या खोलीत त्यांच्या आई-वडिलांचे चित्र या पद्धतीने लागले होते की सकाळी उठल्या बरोबर त्यांची दृष्टि त्यांच्या चित्रावरच पडत असे. या बहुआयामी पण अंतर्मुखी स्वाभावाचे निवडणूकीच्या रणनीतित निपुण माणसाची कहाणी सामान्यापासून असामान्य बनण्याची आहे. साधेपणा पसंत करणारा, पर्यावरणाचा प्रेमी-संरक्षक, कर्मयोगी, अत्यंत प्रामाणिक, बुद्धिवादी, दुसऱ्यांच भल इच्छिणारा चिंतक, ज्ञानउपासक अचानकच 18 मे ला सकाळी झोपेतच ह्रदयाघाताने अनंताकडे प्रस्थान करुन गेला. 

या साहित्यकाराने रचलेल व प्रकाशित झालेल साहित्य या प्रकारे आहे -  1. सृजन से विसर्जन तक, 2. नर्मदा समग्र, 3. शताब्दी के पांच काले पन्ने(सन्‌ 1900 से सन्‌ 200), 4. सॅंभल के रहना अपने घर में छिपे हुए गद्दारों से, 5. महानायक चंद्रशेखर आजाद, 6. रोटी और कमल की कहानी, 7. समग्र ग्रामविकास, 8. अमर कंटक से अमरकंटक तक, 9. Beyond Copenhagen, 10. Yes I Can. So Can We.  g§nH©$ …  e-mail : anilmdave@yahoo.com 

No comments:

Post a Comment