Friday, 3 August 2012

धर्म मजहब रुपी फूले

धर्म मजहब रुपी फूले

वीर सावरकरांनी हिंदूधर्माला 'धर्मसमुच्चय" म्हटले आहे. सावरकरांच्या म्हणण्यानुसार हिंदूधर्म हे नाव कांही कोणा एका विशिष्ट धर्माचे अथवा पंथाचे विशेष आणि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची आणि पंथांची ही भारतभूमि पितृभूमि आणि पुण्यभूमि आहे त्या सगळ्यांचा समावेश करणाऱ्या धर्मसंघाचे हिंदूधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.

वीर सावरकरांच्या 'हिंदू"च्या व्याख्येप्रमाणे 'आसिंधू-सिंधू पर्यन्ता, यस्य भारतभूमिका। पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः। सावरकरांची 'हिंदू" शब्दाची ही व्याख्या अतिव्याप्ति आणि अव्याप्ति ह्या दोन्ही प्रकारच्या दोषांपासून मुक्त आहे. ह्या व्याख्येप्रमाणे वैदिक धर्मानुयायी, शीख व भारतीय बौद्ध, जैन, लिंगायत, नास्तिक, ब्राम्होसमाजी, गिरीजन, वनवासी इत्यादींचा समावेश 'हिंदू"त होतो. चीनी बौद्धांचा समावेश हिंदूत होत नाही. कां की हिंदुस्थान जरी त्यांची पुण्भू असली तरी पितृभूमि नाही. मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, ज्यू यांचा समावेश अर्थात्‌च हिंदूत होऊ शकत नाही.

सावरकरांच्या या धर्मसमुच्चयाचे प्रतीक आहे झेंडूचे फूल जे धार्मिक आणि सामाजिक कार्यात विपुलतेने उपयोगात आणले जाते. झेंडूच्या फूलाचा पुष्पकाळ येतो भाद्रपद महिन्यात आणि दसरा-दिवाळी मध्य सारे धार्मिक विधि झंडूमय होऊन जातात. तरी देखील झंडूचे फूल संपूर्ण भारतात वर्षभर उपलब्ध असते.

वनस्पतीशास्त्रानुसार झंडूचे फूल एस्टेरेसी वनस्पतीचे फूल असून त्याची विशेषता ही आहे की त्यांस तोडून त्याच्या पाकळ्यांना पण आपण देवास अर्पण करु शकतो. याच्या उलट धोत्रा, मोगरा, कण्हेर बरोबर आपण असे करु शकत नाही. याचे कारण हे आहे की सर्वसाधारणांस जरी हे एक फूल भासत असले तरी ते एक फूल नसून त्यांत अनेक फूले एक समूहात जोडलेले असतात. या फूलांच्या गुच्छ्‌यास इंफ्लोरेसेंस म्हणजे पुष्पक्रम म्हटले जाते. हे पुष्पक्रम या प्रकारे जोडलेले असतात की आमच्या दृष्टिस ते एक फूलच वाटते.

हे हिंदूधर्मसमुच्चय रुपी भगवा-केशरी-पिवळ्या रंगाचे झेंडू नैसर्गिक रुपातच हातात टाकून एकाच मातेच्या उदरातून प्रसवलेल्या म्हणजे सख्ख्या भाऊंन सारखे पुष्पक्रम असेना कां परंतु, व्यवहारिक जीवनात अबोली सारखे नाजुक नसून एक टिकून राहणाऱ्या गुणाचे, सहजच न कोमजणारे म्हणजे सरळतेने न चेंचणें जाणारे फूल आहे. ठीक त्याचप्रमाणे जसे आमचा हिंदूधर्म जो कित्येक परचक्रांना झेलून देखील समाप्त झाला नाही, टिकलेला आहे, अनादि आहे, अनंत आहे, सनातन आहे. याच प्रकारे झेंडूचे फूल पण सगळ्यात आधी कोठे उमळले? कोठ पर्यंत उमळत राहणार आहे! अशा प्रकारचे प्रश्न निरर्थक असून ते पण अनादि आहे, अनंत आहे.

झेंडूचे फूल जे फूलांचा समुच्चय आहे च्या सगळ्यात बाहेर हिरव्या पाना सदृश्य रचनेनी बनलेली कपा सारखी रचना असते, जिस इन्वाल्यूकर म्हणतात. ही रचना या फूलांना एकजुट ठेवण्याचे काम करते. अचूक त्याच प्रमाणे ज्या प्रमाणे की, हिंदुत्व. जो हिंदूधर्मसमुच्चयाच्या धर्मांना एक रचनेत ठेवतो, जोडून ठेवतो आणि जसे इन्वाल्यूकरला जर का तोडून दिले गेले किंवा या फूलांना इन्वाल्यूकर पासून वेगेळे करुन दिले गेले तर हा पुष्पसमूह हळू-हळू विखरुन जाईल. तसेच जर कां या हिंदुत्वास नष्ट-भ्रष्ट करुन दिले गेले किंवा आम्हीं त्यांस सोडून दिले, आम्हांस त्यापासून वेगळे करुन दिले गेले तर, हे सारे भारतोद्‌भव धर्म जे या धर्मसमुच्चयाचा भाग आहे विखरुन जातील आणि परिणाम ....

झेंडूच्या बाहेरील परिघात जे किरण पुष्पक असतात, त्यांत सूर्य किरणांचा भास होतो, वरपांगी असतात. जर कां ते नसते तर झेंडूने आपली सर्व सुंदरता गमावली असती. उपर्युक्तांची तुलना हिंदूधर्माशी या प्रकारे केली जाऊ शकते की, जे किरण पुष्पक आहेत ते आमच्या धर्मसमुच्चयाचे धर्म विचारांचे प्रतीक आहेत जे पूर्ण विश्वाला सूर्या सारखे आलोकित करित आहेत, प्रेरणा देत आहेत, मार्गदर्शन करित आहेत. या सूर्यप्रकाशाला पसरविण्या करिता प्राचीनकाळात आमचे पूर्वज ऋषि, मुनि, धर्मप्रचारक बाहेर पडले आणि आपल्या ज्ञानानी संपूर्ण विश्वाला आलोकित केले.

झेंडूच्या केंद्रात डिस्क पुष्पक असतात. यांत पाकळ्या आणि अंकुर असतात या बरोबरच नर-मादा जननांग देखील. हे पूर्ण पुष्प असतात आणि वंशवृद्धि करतात. या झेंडू सारखेच आमच्या धर्मसमुच्चयाच्या केंद्रात आहे आमची परधर्म सहिष्णुता, सगळ्या धर्मांच्या धार्मिक स्वतंत्रतेची मान्यता. ज्यानुसार सगळ्यांना आप-आपल्या धर्मपालनाची स्वतंत्रता त्याच्या केंद्रात आहे आमची ही मान्यता -

1). 'आकाशात्‌ पतितं तोयं यथा गच्छति सागरम्‌। सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति।। अर्थात्‌ आकाशातून पडलेले (पावसाचे) पाणी (नद्यांद्वारे) समुद्रात जाऊन मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार केशवास जाऊन पोचतो. 2). न देवो विद्यते काष्ठे, न पाषाणे, न मृण्मये। भावे हि विद्यते देवः, तस्माद्‌ भावो हि कारणम्‌।। अर्थात्‌ देव हा लाकडात, दगडात किंवा मातीत (म्हणजे त्यांनी बनविलेल्या मूर्तीत) नसतो. देव हा भक्तिभावातच असतो. 'देव भावाचा भुकेला", 'भाव तोचि भगवंत।" म्हणून भक्तिभाव हेच उपासनेचे कारण होय. 3). श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चैव अवधार्यताम्‌। आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचेरत्‌।। अर्थात्‌ धर्मात जे काय आहे ते सारे ऐका आणि ऐकून लक्ष्यात ठेवा - 'आपल्याला ज्या गोष्टी प्रतिकूल म्हणजे दुःख देणाऱ्या असतील त्या इतरांच्या बाबतीत आचरु नयेत, लोकांनी आपणास जे करु नये असे आपल्याला वाटते, तसे आपण दुसऱ्याला करु नये. जसे आपण तसे इतर, ही आत्मौपम्य दृष्टी, हे धर्माचे सार होय.  

ह्या शिकवणीमुळेच आमच्या येथे एकाच कुटुंबात शैवांच्या शिवाची तर वैष्णवांचा देव विष्णुच्या अन्य अवतारांची पूजा-उपासना एकाच वेळेस एकमेकांबरोबर केली जाऊ शकते, केली जाते. एकाच कुटुंबातील सभासद वेग-वेगळ्या धर्माचे पालन करु शकतात. कोठे ही कशाही प्रकारची कोणतीही बाधा आणली जात नाही. हिंदूधर्मात झालेले अनेकविध धर्मप्रवर्तक, ऋषि, मुनि, अवतार, धर्मवीर, हुतात्म्यांनी याच उदात्त परंपरांना पुढ़े वाढ़विले, क्षरणापासून रोखले, रक्षा केली, धार्मिक-सामाजिक क्षेत्रांशी संबंधित वेगवेगळ्या विचारांना पुढ़े पसरविले, दृढ़ता दिली, त्यांत सुधार करुन वृद्धि केली, गौरव दिला.

ह्या मुळेच स्वतःच्या देशात त्रस्त आणि पीडल्या गेल्या मुळे पलायन करुन आलेल्या ज्यू आणि पारशी धर्मांना पण आमच्या येथे आश्रय मिळाला. फळफळण्याची संधि मिळाली. हेच वैशिष्टय झेंडूच्या फूलाचे पण आहे. झेंडूच्या फूलावर जेव्हा कोणी फूलपाखरु किंवा मधमाशी सारखे बाहेरील सभासद येतात तेव्हा त्यांना मकरंदाच्या रुपात थोडे-थोडे प्रेम सगळ्या फूलांकडून मिळते व खूप फळफळण्याचा आशीर्वाद देखील. झेंडूच्या फूलाच्या पाकळ्या छोट्या-मोठ्या, टोकदार, पसरट असतात तसेच लहान-मोठ्या, तीक्षण टोचणाऱ्या इत्यादी सगळ्या प्रकारच्या धर्मविचारांना, त्यांच्या प्रवर्तकांना आमच्या येथे स्थान मिळालेले आहे आणि ज्या प्रकारे झेंडूच्या फूलाचे रोपटे सगळ्या फूलवाल्या रौपट्यांमध्ये सगळ्यात मोठे व विकसित कुळ आहे त्याच प्रकारे सगळ्या धर्मात हिंदूधर्म सगळ्यात प्राचीन, सनातन, उदात्त आणि विकसित आहे.

याच श्रंखलेत एक फळ संत्रे पण येते. ज्याचे वरील कडक, लवचिक, आकर्षक चमकदार साल हिंदुत्वा सारखेच आहे ज्याकडे सगळेच आकर्षित होतात. तसेच जेव्हा वीर सावरकरांचे हिंदुत्व दर्शन सगळ्यांसमोर आले तेव्हा त्याच्या प्रकाशाने सगळ्यांचे डोळे दिपले. स्वामी श्रद्धानंद, महामना पंडित मदनमोहन मालवीय, संघसंस्थापक डॉ. हेडगेवार सारखी लोक आकर्षित आणि प्रभावित झाली होती.

संत्र्याच्या आतील रसदार गर जो फोडींच्या रुपात असतो त्या फोडी हिंदूधर्मसमुच्चयात सामील विभिन्न धर्मां सारख्या आहेत तथा त्या फोडींमध्ये भरलेला रुचकर रस हिंदुधर्मसमुच्चयाचे तत्त्वपूर्ण धर्मविचार आहेत. रसदार गरा मध्ये उपस्थित कडक बिंया हिंदुधर्मसमुच्चयाचे विभिन्न धर्मांचे धर्मप्रवर्तक, विचारक, समाजसुधारक महापुरुष आहेत ज्यांनी त्या धर्माला श्रेष्ठता कष्ट सहन करुन अडचणींचा सामना करुन दिली. समाजाच्या हिता करिता त्यांच्या विचारांचा हार न मानता प्रचार-प्रसार केला.

संत्र्याच्या फोडींच्या वरील पातळ आवरणरुपी साल प्रत्येक भारतोद्‌भव धर्माला दुसऱ्या भारतोद्‌भव धर्मापासून वेगळे करण्याचे विरळ से आवरण मात्र आहे आणि मुख्य आवरण तथा या झिरझिरीत आवरणाच्या मधील वरील तंतु त्या सगळ्या विभिन्न धर्मरुपी फोडीं आपसात आणि मुख्य आवरण हिंदुत्वाशी पण जोडून ठेवण्यात सहायक सिद्ध होणारे सर्वसाधारण सण-वार, रीति, परंपरा आहेत. ज्या सगळ्यांच्या सर्वसाधारण मान्यतांच्या एकतेला दर्शविण्या बरोबरच हे पण दर्शवितात की, ते एकाच बीजापासून उत्पन्न झालेल्या हिंदुत्वरुपी वृक्षाच्या शाखा आहेत.

आता आम्ही त्या हिंदुत्वावर येतो ज्याचे यशगान इतक्या वेळापासून आम्ही गात आहोत जे सगळ्या भारतोद्‌भव धर्मांना जोडून आहे. हिंदुत्वाचे दर्शन देणारे हिंदूराष्ट्राचे उद्‌गाते वीर सावरकरांप्रमाणे - हिंदू या शब्दापासून इंग्रजी मध्ये 'हिंदुइझम" (हिंदूधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. जेव्हाकि हिंदुत्व हा हिंदूधर्मापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदूधर्म या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचाच त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगाचाही समावेश होतो. येथेच हे सांगणे ही योग्य ठरेल की, पैगंबर महंमदाच्या जन्मापूर्वी नव्हे तर अरब हे एक 'लोक" म्हणून ओळखले गेल्यापूर्वी हे प्राचीन राष्ट्र आपणाकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे.

हिंदू शब्द मूलतः देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु-सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधूसिंधू"  अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीनकाळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृति, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांची संस्कृति, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदू होत. त्या हिंदूराष्ट्राचे घटक होत. वैदिककाळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्ट्या एकात्म असा गट घडवून आणित होते त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता-पावता जे फळ आले ते म्हणजे वैदिककाळातील त्या सिंधूचेच आज संबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू व पुण्यभू मानीत असलेले असे हिंदूराष्ट्र होय.

सावरकरांच्या या हिंदूराष्ट्राचा व हिंदूधर्माचा जरा देखील संबंध नाही. त्यांच्या बुद्धिवादी दृष्टिकोणानुसार ते 'हिंदू लोकांचे न्याय्य अधिकार सुरक्षित ठेवणारा राष्ट्र याप्रकारचा व्यापक अर्थ घेतात." त्यांच्या हिंदूराष्ट्राचा दुसरा अर्थ बहुसंख्य लोकांचे राष्ट्र. या अर्थानी  'बहुसंख्यकत्वच राष्ट्रीयत्व आहे," याप्रकारचा लोकतांत्रिक सिद्धांत ते प्रस्तुत करतात. हिंदू बहुसंख्यक असल्यामुळेच हिंदुत्वच बहुसंख्यकत्व आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याच अर्थाने 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे," अशा प्रकारचा सिद्धांत ते प्रस्तुत करतात.  या सिद्धांताचा अर्थ अहिंदुंना राष्ट्रीयत्व नाही असा होत नाही. अहिंदू अल्पसंख्य आहेत इतकीच वस्तुस्थिति दाखवून देणे या सिद्धांताचे काम आहे. बहुसंख्यकांना अल्पसंख्य बनविणे राष्ट्रीयत्वाच्या विरोधात आहे, हे प्रखरपणे दाखवून देण्याकरिता या सिद्धांताला प्रस्तुत केले गेले आहे. पुनश्च या हिंदुत्वाचा हिंदूधर्माशी कोणत्याही प्रकारच संबंध नाही।

दुसरीकडे मध्यपूर्वात जे मजहब उमळले, विकसित झाले ते वनस्पतीशास्त्राच्या घुंगुर मोगरा (जास्मिन सॅमबॅक) फूला सारखे होते. मोगऱ्याचे फूल ओलेसिया कुळाचे मानले जाते. घुंगुर मोगरा फूलाची रचना एकात एक ठेवलेल्या पेल्या सारखी असते. चळतीतून एक पेला काढ़ला की जसे स्वतंत्र पेला असतो तसेच मूळ ज्यू धर्मातून निघालेला ख्रीस्ती रिलीजन वेगळा म्हणजे स्वतंत्र असतो. याप्रकारेच त्याच चळतीतून निघालेला इस्लाम सुद्धा त्याप्रकारेच न केवळ वेगळा आणि स्वतंत्रच होत नाही तर पूर्वीच्या धर्मांशी जणू भयंकर शत्रुतेचेच नाते ठेवतो. म्हणूनच म्हणावे लागत आहे की शेवटच्या प्रेषितांच्या इस्लाम मजहबची ही उत्पत्ति आज मात्र त्याच मूळ मोगरा (जास्मिन सॅमबॅक) फूलाशी सारे संबंध तोडून पूर्णपणे कुळ बदलून कण्हेरीचे गुणधर्म घेऊन बसली आहे. संस्कृत भाषेचा कर्णिकार, इंग्रजीचा ओलिएंडर आणि वनस्पतीशास्त्रानुसार थेवेशिया नेरीफोलियाच्या रुपात ओळखली जाणारी ही वनस्पती म्हणजे केवळ कण्हेर पुष्पच नाही तर त्याची सारी अंगेच विषारी आहेत. इथपर्यंत की, असे म्हटले जाते की त्याच्या जवळपास साप देखील फटकत नाही. वनस्पतीशास्त्रानुसार हा विषारी पदार्थ ग्लाइकोसाईडच्या रुपात असतो. एकूण रोपाच्या अंग-अंगातून निघणारा दुधा सारखा रस (मिल्की लेटेक्स), रोपाचे मूळ, बीं सगळे काही विषारी, इतकच नव्हे तर त्याच्या फूलाला जास्त वेळ हुंगणे देखील घातक तर रोपाला जाळल्यावर निघणारा धूर सुद्धा आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव टाकणारा मानला जातो. तर आता कालाय तस्मै नमः म्हणून शांत बसायचे की .........

No comments:

Post a Comment